Breaking News

ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मानधनासह विविध मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष हरिभाऊ वराट यांचा पाठपुरावा

 



जामखेड : जामखेड तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मानधनासह विविध सेवा विषयक मागण्यांकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी रोजगार सहायक संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ वराट यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी दुर्गा माता मंडप डोंबिवली पूर्व ,मुंबई केली आहे 


ग्रामरोजगार सेवकांना नियमितपणे मानधन मिळावे तसेच प्रलंबित मानधनाची रक्कम तातडीने संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


ग्रामरोजगार सेवक ग्रामीणb भागात रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून, गावपातळीवर विविध कामांची नोंद, लाभार्थ्यांशी समन्वय आणि योजनेच्या कामकाजात योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे हरिभाऊ वराट यांनी सांगितले.


तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा विषयक विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने स्पष्ट कार्यवाही करून ग्रामरोजगार सेवकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.


“ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि सेवा विषयक मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी मागणी हरिभाऊ वराट, तालुकाध्यक्ष, रोजगार सहायक संघटना, जामखेड तालुका यांनी केली आहे.


— रोजगार सहायक संघटना, जामखेड तालुका

#जामखेड

#ग्रामरोजगारसेवक

#रोजगारसहायकसंघटना

#मानधन

#मनरेगा

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.