Breaking News

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध न्याय्य हक्कांच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मा. मंत्री. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या उपस्थितीत 'ग्रामरोजगार सेवक संघटना' व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.



ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत रोजगार पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आपले राज्य शासन अत्यंत सकारात्मक आहे. त्यांच्या मानधन, सेवा संरक्षण तसेच प्रशासकीय अधिकारांशी संबंधित प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ठाम ग्वाही यावेळी दिली.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात आपल्या ग्रामरोजगार सहाय्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कामांचे नियोजन, अंमलबजावणी, नोंदी ठेवणे आणि मजुरांशी समन्वय साधणे यासारख्या जबाबदाऱ्या ते अहोरात्र यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्यच आहे. या बैठकीत ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मानधन वितरणातील विलंब, सेवा संरक्षण, नियुक्ती व बडतर्फीचे अधिकार, शासकीय ओळखपत्र तसेच इतर प्रशासकीय अडचणींवर आम्ही सखोल चर्चा केली. या सर्व मागण्यांबाबत आदरणीय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.


बैठकीत रोजगार हमी विभागाकडून सध्याच्या मानधनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील सुमारे २९ हजार ४७३ ग्रामरोजगार सहाय्यकांसाठी शासन निर्णयानुसार प्रतिमाह ८ हजार रुपये निश्चित मानधन, प्रोत्साहनपर मानधन, प्रवास भत्ता आणि डेटा पॅक भत्त्याची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच, निश्चित मानधनासाठी आवश्यक किमान कामकाजाचे निकष स्पष्टपणे निश्चित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, संघटनेच्या मागणीनुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना शासकीय कामकाजात सुलभता यावी, यासाठी त्यांना हक्काचे शासकीय ओळखपत्र (ID Card) उपलब्ध करून देण्याचा निर्णय मान्य केला.


या बैठकीस ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप माने यांच्यासह संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Chandrashekhar Bawankule Shivsena - शिवसेना 

#MaharashtraGovernment #RuralDevelopment

#EmploymentGuaranteeScheme #S


hivsena #BharatshethGogawale

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.