Breaking News

अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळ्यातील सुमारे १५०० एकर जमीन निंबे ग्रुप कंपनी (ग्लोबल डिफेन्स कंपनी लिमिटेड) यांना ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाबाबत कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, मुंबई येथे आढावा बैठक पार पडली.

 

हरेगाव मळ्यातील १५०० एकर जमीन ग्लोबल डिफेन्स प्रकल्पासाठी; ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्याबाबत आढावा बैठक

मुंबई | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळ्यातील सुमारे १५०० एकर जमीन निंबे ग्रुप कंपनी (ग्लोबल डिफेन्स कंपनी लिमिटेड) यांना ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाबाबत कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, मुंबई येथे आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित प्रकल्प, जमीन उपलब्धता, भाडेपट्टा प्रक्रिया तसेच विविध प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाशी संबंधित आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

बैठकीस महसूल विभागासह संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित प्रकल्पामुळे औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रस्तावाची अंमलबजावणी शासनाच्या अंतिम


निर्णयानंतरच होणार आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.