Breaking News

बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणारे दोघे जेरबंद; माजलगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई


सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना अटक; ₹34,790 किमतीची सोन्याची पोत जप्त

माजलगाव | प्रतिनिधी

माजलगाव शहरातील नवीन बसस्थानकात 70 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या दोन आरोपींना माजलगाव शहर पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत 7 ग्रॅम वजनाची, 100 मणी व दोन डोऱ्यांची सोन्याची पोत, अंदाजे ₹34,790 किमतीची जप्त करण्यात आली आहे.

ही घटना 15 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता नवीन बसस्थानक परिसरात घडली होती. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 239/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानुसार 27 जुलै 2026 रोजी सारिका गोरख शिंदे (वय 36, रा. शंकरनगर, पाथर्डी, जि. अहमदनगर) आणि वैजनाथ नामदेव गुंजाळ (वय 55, रा. गांधीनगर, बीड) यांना अटक करण्यात आली.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके-मंडल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आशोक आनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या पथकाने केली.

माजलगाव बसस्थानकातील सोन्याची पोत चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त




No comments

Note: Only a member of this blog may post a comment.