अहिल्यानगरात वाहतूक व्यवस्थेचा ड्राय रन; ४ ते १० जुलै नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन
डीएसपी चौक व कायनेटिक चौक येथे सुधारित वाहतूक व्यवस्थेची चाचणी; सुरक्षित व कोंडीमुक्त शहरासाठी प्रशासनाचा पुढाकार
वाहतूक शिस्त, शहराची प्रगती ! 🚦
अहिल्यानगर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना शोधण्यासाठी व प्रवाशांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी 'डीएसपी चौक' आणि 'कायनेटिक चौक' येथे सुधारित वाहतूक व्यवस्थापनाची चाचणी (ड्राय रन) आयोजित करण्यात आली आहे.
🗓 कालावधी: ४ जुलै ते १० जुलै, २०२६
या कालावधीत होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, परंतु भविष्यातील सुसह्य वाहतुकीसाठी हे बदल महत्त्वाचे आहेत. प्रशासनाच्या या उपक्रमात वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपले सहकार्यच आपल्या शहराला शिस्तबद्ध आणि प्रगत बनवेल.
- डॉ.पंकज आशिया, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर
#AhilyanagarTraffic #SmartCity #DistrictAdministration #PublicAppeal #TrafficManagement #Ahilyanagar

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.