Breaking News

कोपरगाव, श्रीगोंदा व महासैनिक लॉनसाठी विविध पदांवर भरती

 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध पदांची कंत्राटी भरती


१५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


अहिल्यानगर, दि. २ : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखालील माजी सैनिकांच्या पाल्यांचे वसतिगृह (कोपरगाव), माजी सैनिक विश्रामगृह (श्रीगोंदा) तसेच महासैनिक लॉन येथे विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वि. ल. कोरडे यांनी केले आहे.


भरती प्रक्रियेत सहायक वसतिगृह अधीक्षक, सहायक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी आणि सफाई कामगार या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी नागरी उमेदवारांनाही अर्ज करता येणार असून, माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवार व्यसनमुक्त असणे आवश्यक असून चौकीदाराचे पद निवासी स्वरूपाचे आहे.


माजी सैनिक उमेदवारांनी अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक व माजी सैनिक ओळखपत्र यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. तसेच सर्व उमेदवारांनी आधार कार्डाची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.


विहित मुदतीत प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.