Breaking News

आरोग्य सेवेत नवी क्रांती! '१०२ रुग्णवाहिकांसाठी कॅशलेस पेट्रोकार्ड' सुविधा सुरू

 



मुंबई, दि. २ ऑगस्ट : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि अखंड ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने '१०२ रुग्णवाहिका सेवेसाठी कॅशलेस पेट्रोकार्ड' सुविधा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या उपक्रमामुळे राज्यभर कार्यरत असलेल्या १०२ रुग्णवाहिकांना इंधनासाठी रोख रकमेची आवश्यकता भासणार नाही. पेट्रोकार्डद्वारे थेट इंधन भरता येणार असल्याने रुग्णवाहिकांची सेवा अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे. तसेच इंधन खर्चाचे डिजिटल व्यवस्थापन, पारदर्शकता आणि नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या निर्णयामुळे रुग्णवाहिका सेवेत कोणताही अडथळा येणार नाही, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध राहण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेवेचे आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाचे हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


  • आरोग्य | महाराष्ट्र | शासन निर्णय | १०२ रुग्णवाहिका | MahaDGIPR

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.