नान्नजच्या विविध मागण्यांसाठीचे उपोषण यशस्वी; लेखी आश्वासनानंतर शहाजी राजेभोसले यांनी उपोषण मागे घेतले
जामखेड | प्रतिनिधी
नान्नज गावातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणास बसलेले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आज त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
महसूल विभागाच्या प्रतिनिधी इकडे मॅडम तसेच पोलीस प्रशासनाचे API मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शहाजी राजेभोसले यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
गावाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत गावकऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या संघर्षात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे तसेच शहाजी राजेभोसले यांच्या चिकाटीचे व जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.