Breaking News

अहिल्यानगरमध्ये १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; कोर्ट फी परत, तडजोडीतून वाद मिटविण्याची सुवर्णसंधी

 प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी कचरे यांच्या अध्यक्षतेखाली १२ सप्टेंबर रोजी  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन


अहिल्यानगर दि १० (जिमाका)  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय  नवी  दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार १२ सप्टेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदलातीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच बँक व वीज वितरण कंपनीचे दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रकरणे लोक अदालतमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. 

लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटवल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा अहिल्यानगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची  असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.

 संपर्क क्रमांक 8591 903616 तसेच dlsanagar@gmail.com यावर ईमेल करू शकता- लोकन्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणांमध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकता.

 राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शिवाजी भ. कचरे, व सचिव, योगेश पैठणकर यांनी केले आहे.


#राष्ट्रीयलोकअदालत #NationalLokAdalat #अहिल्यानगर #Ahilyanagar

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.