जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते ध्वजारोहण
अहिल्यानगर | प्रतिनिधी
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करण्यात आली तसेच उपस्थितांनी एकत्रितपणे राष्ट्रगीताचे गायन करून देशभक्तीची भावना व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी कर्तव्यनिष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा भिडे, भूसंपादन अधिकारी श्रीमती सावंत, उपजिल्हाधिकारी श्री दळवी, जिल्हा सूचना विभागाचे पवन टेंभुर्णे, नगर विकास विभागाचे सहसंचालक श्री पठारे, तहसीलदार मयूर बेरड, श्री गायकवाड, श्रीमती पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, निमंत्रित मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
#अहिल्यानगर #स्वातंत्र्यदिन2026 #ध्वजारोहण #जिल्हाधिकारी #DistrictAdministration





No comments
Note: Only a member of this blog may post a comment.