Breaking News

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे निर्देश: अतिवृष्टीग्रस्त रस्ते व पुलांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करा

 



मुंबई, दि. १३ ऑगस्ट : राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन ती वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री भोसले बोलत होते. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नुकसानग्रस्त रस्ते व पुलांच्या दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

बैठकीत पावसाळी परिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, रस्ते व पुलांची दुरुस्ती, आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे, महामार्गालगतच्या जनसुविधा केंद्रांची उभारणी तसेच ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा’ अंतर्गत जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#शिवेंद्रसिंहराजेभोसले

#सार्वजनिकबांधकामविभाग

#अतिवृष्टी

#रस्तेदुरुस्ती

#महाराष्ट्रसरकार

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.