Breaking News

जामखेड तालुक्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीवर एलसीबीची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल

 

अहिल्यानगर, दि. २८ : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत नाजर व कोल्हेवाडी परिसरातील टपऱ्यांवरून सुमारे २ लाख १० हजार रुपयांहून अधिक किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला.

या कारवाईप्रकरणी नाजर येथील गणेश गोरे, विशाल वाटणे, वृषभ पोते, योगेश मोहोळकर तसेच कोल्हेवाडी येथील युवराज कोल्हे यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, जप्त केलेला माल पुरविणाऱ्या राजेवाडी आप्पा कुमटकर आणि कडा (आष्टी) येथील सचिन जाधव हे दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.