केंद्राकडून महाराष्ट्राला ७,०२२ कोटींचा अतिरिक्त निधी; विकासकामांना मिळणार मोठी चालना
नवी दिल्ली / मुंबई, दि. ३ ऑगस्ट : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सर्व राज्यांना एकूण १ लाख ९ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त कर वितरणाचा अग्रीम हप्ता वितरित केला आहे. या वाटपामध्ये महाराष्ट्राला ७,०२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.
हा निधी १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून, त्यामुळे राज्य सरकारला विविध विकासकामांसाठी आर्थिक नियोजन अधिक सक्षमपणे करता येणार आहे.
या अतिरिक्त निधीचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधा उभारणी, रस्ते, पूल, सिंचन, भांडवली खर्च तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होणार आहे. यामुळे विकास प्रकल्पांना गती मिळण्याबरोबरच निधीची उपलब्धता वाढून कामांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यास मदत होईल.
महाराष्ट्राला मिळालेल्या ७,०२२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्पांना चालना मिळणार असून, नागरिकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीतही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#महाराष्ट्र #केंद्रसरकार #विकासकामे #अर्थसंकल्प #करवाटप


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.