Breaking News

राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; ५३.२५ लाखांचा एमडी ड्रग्ज व मुद्देमाल जप्त

 

अमरावती | प्रतिनिधी


राजापेठ पोलीसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे २७७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ₹५३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


पोलीसांनी दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील साई हेरिटेज, अकोली रोड, अमरावती येथे छापा टाकून साहिल राजेश मेहरा (वय २२, रा. शिवाजी संकुल, अकोली रोड, अमरावती) याला ताब्यात घेतले.


आरोपीच्या ताब्यातून सुमारे २७७ ग्रॅम एमडी (अंदाजे किंमत ₹४१.५५ लाख), फोर्ड इकोस्पोर्ट कार (अंदाजे किंमत ₹१० लाख) तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण ₹५३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीकडून अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता व या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

#Amravati #RajapethPolice #MDDrugs #CrimeNews #MaharashtraPolice #DrugSeizure #ApleSatyaAhilyanagar #BreakingNews


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.