नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९वा हप्ता तातडीने जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अहिल्यानगर | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लाखो पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९वा हप्ता तातडीने जाहीर करून वितरित करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा हिंदी मराठी पत्रकार संघाचे तालुका संघटक रविकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
या निवेदनाच्या प्रती कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त आणि सहकार विभागाच्या प्रधान सचिव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामासाठी पेरणी पूर्ण झाली असून बियाणे, खते, औषधे, मजुरी व इतर शेतीकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. मात्र, अद्याप ९वा हप्ता वितरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण आहे.
त्यामुळे शासनाने संबंधित विभागास तातडीने निर्देश देऊन नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९वा हप्ता जाहीर करावा व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर निधी जमा करावा. तसेच हप्त्याबाबत अधिकृत माहिती जाहीर करून शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
रविकुमार शिंदे यांनी शासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना तातडीचा दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
#नमोशेतकरीयोजना
#NamoShetkari
#शेतकरी
#महाराष्ट्रशासन
#रविकुमारशिं
दे


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.