Breaking News

मुंबई वेधशाळेचा इशारा : राज्यातील ११ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

 


अहिल्यानगर, दि. ३ ऑगस्ट २०२६ : मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार आज (३ ऑगस्ट २०२६) राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, तर घाटमाथा व डोंगराळ भागातून प्रवास करणाऱ्यांनी हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, तसेच काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी अधिकृत हवामान सूचना आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

#WeatherUpdate #YellowAlert #Monsoon #MaharashtraRain #IMD


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.