Breaking News

कोल्हापूरला १,८५० कोटींच्या विकासकामांची मोठी भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून, त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असे सांगून कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूरमधील विविध वास्तूंचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.


✅ छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (CPR), कोल्हापूर येथील नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन

✅ इचलकरंजी पोलीस वसाहत, कलानगर येथील नवीन निवासी इमारतीचे उद्घाटन


कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामे :

✅ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक परिसरातील विकासकामांचे लोकार्पण

✅ मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम

✅ करवीर निवासिनी श्री क्षेत्र महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या अंतर्गत निर्मित बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण

✅ स्टेशन रोडवरील बहुमजली कार पार्किंग

✅ रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन

✅ दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

✅ पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या एमआरडीपी प्रकल्पाचे लोकार्पण

✅ संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीचे पुनर्निर्माण

#Kolhapur #DevendraFadnavis #Maharashtra #Development #CPRHospital #MahalaxmiTemple #RankalaLake #HockeyStadium #Infrastructure #KolhapurNews #MaharashtraNews #ApleSatyaAhilyanagar

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.