Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीची कारवाई; ३५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

 श्रीगोंदा | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. सापळा रचून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा एक डंपर जप्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान डंपरसह एकूण ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली असून, संबंधित वाहनचालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


#Ahilyanagar #Shrigonda #IllegalSandMining #SandSmuggling #LCB


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.