🚨 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगरवाडी-दिघी परिसर ‘रेड झोन’ आणि ‘नो फ्लाय झोन’
🚨 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगरवाडी-दिघी परिसर ‘रेड झोन’ आणि ‘नो फ्लाय झोन’
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी-दिघी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता रेड झोन आणि नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे.
मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे योगीराज सदगुरू श्री. गंगागिरी महाराज यांच्या ७९व्या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
संरक्षित व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.
या कालावधीत धनगरवाडी-दिघी परिसरात ड्रोन, हवाई उपकरणे किंवा इतर प्रकारच्या उड्डाणांवर निर्बंध राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
📍 ठिकाण : धनगरवाडी-दिघी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
⏰ कालावधी : २५ ऑगस्ट, पहाटे ५ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
🚫 निर्बंध : तात्पुरता रेड झोन व नो फ्लाय झोन
#देवेंद्रफडणवीस #अहिल्यानगर #राहाता #NoFlyZone #महाराष्ट्र

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.