शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणणारा तरुण अटक
शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणणारा तरुण अटक
अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. अनिल सिताराम सावंत (वय ३०, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिशिंगणापूर परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिल सावंत याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित कायदेशीर कारवाई सुरू असून, गावठी कट्टा आणि काडतुसे त्याच्याकडे कोठून आली तसेच ती कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#AhilyanagarNews
#Shanishingnapur
#CrimeNews
#MaharashtraPolice
#LocalCrimeBranch


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.