जामखेड तालुक्यात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजेवाडी परिसरात हळहळ
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेश बिभिषण कुमटकर (वय २६, रा. राजेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बावी गावच्या शिवारातील एका शेतात महेश कुमटकर हा तरुण गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी तसेच संबंधित ठिकाणी तपास सुरू केला. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे राजेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जामखेड, राजेवाडी, अहिल्यानगर, बावी, जामखेड पोलीस
#जामखेड #राजेवाडी #अहिल्यानगर #ब्रेकिंगन्यूज #स्थानिकबातमी


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.