Breaking News

तिबेटमधून महाराष्ट्रातील ३७ कैलास मानसरोवर भाविकांची सुरक्षित सुटका

 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकाराने तिबेटमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ कैलास मानसरोवर भाविकांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

मुंबई, दि. २९ ऑगस्ट २०२६ : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांनंतर सर्व भाविक आज सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासादरम्यान ते तिबेटमधील सागा येथे अडकले होते.

भाविकांचे काठमांडूहून भारताकडे परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने त्यांना वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते. या परिस्थितीची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून आवश्यक सहकार्य मिळवले.

त्यानंतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सर्व ३७ भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. संकटाच्या परिस्थितीत तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार व्यक्त केले.



#KailashMansarovarYatra #DevendraFadnavis #MaharashtraNews #NepalFloods #Tibet


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.