Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जामखेड तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदासाठी अशोक गाडे यांच्या नावाची कार्यकर्त्यांकडून मागणी

 

रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याची अपेक्षा


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पक्षाच्या जामखेड तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी अशोक गाडे यांची निवड करण्यात यावी, अशी पक्षातील कार्यकर्त्याची इच्छा आहे. या मागणीमुळे पक्षाच्या सोशल मीडिया विभागात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


पक्षाची ध्येयधोरणे, विविध सामाजिक उपक्रम तसेच जनतेच्या प्रश्नांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अशोक गाडे प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


अशोक गाडे यांच्या निवडीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.