Breaking News

तरुणाचा हात तोडण्याच्या घटनेतील दोघांना जामखेड पोलिसांची अटक

 


जामखेड : जामखेड पोलीस ठाणे हद्दीत माजी नगरसेवकाचा भाऊ राहुल हिरामण अंधारे (वय ३४, रा. कन्हेरापोणनगर, ता. जामखेड) याच्यावर जिवेघेणा हल्ला करून त्याचा हात तोडल्याच्या प्रकरणात जामखेड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई १९ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजता जामखेड पोलीस ठाणे हद्दीत राहुल अंधारे याच्यावर हल्ला झाला. घटनेनंतर रुग्णालयात जखमीचा जबाब नोंदवून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी आष्टी परिसरात शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कारवाई करत अमोल ऊर्फ आबा सुदाम पिसाळ (वय ३६, रा. पिसाळवाडी, ता. आष्टी, जि. बीड) आणि श्रीहरी मुकुंद बेदरे (वय २६, रा. राम मंदिर गल्ली, ता. आष्टी, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. Jamkhed Press Note.pdf

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बेल्हेकर, दत्तू बेल्हेकर, प्रकाश जाधव आणि गणेश साने सहभागी होते. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत.

— आपलं सत्य अहिल्यानगर

मुख्य संपादक : रवीकुमार शिंदे

निर्भीड | निष्पक्ष | विश्वासार्ह

#जामखेड #जामखेडपोलीस #अहिल्यानगर #गुन्हेगारी #पोलीसकारवाई

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.