Breaking News

पाथर्डीत अवैध मावा निर्मितीवर LCBची कारवाई!

 



५४ हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथे अवैधरीत्या मावा तयार करणाऱ्या व्यक्तीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाई केली. या कारवाईत मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक मशीन, एक किलो तयार मावा आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाठवाडी येथे गणेश बाळासाहेब शिरसाठ (वय ३१) हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन, एक किलो तयार मावा आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

संपादक: रवीकुमार शिंदे | आपलं सत्य अहिल्यानगर | ऑल इंडिया आरटीआय न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर | भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव | हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका संघटक जामखेड

#आपलंसत्यअहिल्यानगर #अहिल्यानगर #पाथर्डी #LCB #पोलीसकारवाई #मावाकारवाई #महाराष्ट्रबातम्या

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.