रोजगार हमी योजनेतील अडचणींबाबत मुख्यमंत्री सचिवालयाची दखल; निवेदन रोजगार हमी विभागाकडे पाठविले!
ऑफलाइन हजेरीपत्रकाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार रवीकुमार शिंदे यांच्याकडून आभार
अहिल्यानगर : दुष्काळी भागातील रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, फळबाग व इतर वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून मजुरांसाठी ऑनलाइन हजेरीपत्रकासोबत ऑफलाइन हजेरीपत्रकाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रवीकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे ई-मेलद्वारे केली होती.
या मागणीची मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेतली असून, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे प्रतिसाद देत संबंधित निवेदन योग्य त्या कार्यवाहीसाठी रोजगार हमी योजना विभागाकडे पाठविण्यात आल्याचे कळविले आहे. तसेच याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी आणि वैयक्तिक लाभाच्या कामांच्या लाभार्थ्यांना ऑनलाइन हजेरी प्रक्रियेमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑफलाइन हजेरीपत्रकाचा पर्याय उपलब्ध झाल्यास अनेक लाभार्थ्यांना दिलासा मिळू शकतो.
सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेत निवेदन संबंधित विभागाकडे पाठविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी आणि संबंधित प्रशासनाचे पत्रकार रवीकुमार शिंदे यांनी आभार मानले आहेत.
मात्र, संबंधित विभागाने या मागणीवर केवळ चौकशी न करता प्रत्यक्ष सकारात्मक निर्णय घेऊन दुष्काळी भागातील मजूर व लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा रवीकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
रवीकुमार शिंदे मुख्य संपादक – आपलं सत्य अहिल्यानगर हिंदी मराठी पत्रकार संघ – तालुका संघटक भारतीय पत्रकार अधिकार परिषद – महाराष्ट्र राज्य सचिव माहिती अधिकार कार्यकर्ता
#मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #रोजगारहमीयोजना #मनरेगा #अहिल्यानगर #दुष्काळ #ऑफलाइनहजेरी #रवीकुमारशिंदे #आपलंसत्यअहिल्यानगर #महाराष्ट्रशासन


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.