Breaking News

आयकार्ड कुठे आहे?KDMC

 


KDMC ब प्रभाग विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; आयकार्डबाबत चौकशीची मागणी


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रातील विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी शैलेश धालवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, त्यांच्या कार्यालयातील आयकार्डसंबंधी प्रकाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अधिकृत ओळखपत्र (आयकार्ड) परिधान केले नसल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, आयकार्ड बनवण्यासाठी दिले असल्याचे, पर्समध्ये असल्याचे तसेच गाडीत असल्याचे वेगवेगळे सांगितल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांच्या उत्तरांबाबत आणि कार्यालयीन शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.


महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजादरम्यान लागू असलेल्या नियमांचे पालन करून आपली अधिकृत ओळख स्पष्ट ठेवणे अपेक्षित आहे. नागरिकांना अधिकाऱ्यांची ओळख सहज पटावी आणि प्रशासनात पारदर्शकता राहावी, यासाठी ओळखपत्रासंबंधी नियमांचे पालन महत्त्वाचे आहे.


संबंधित अधिकाऱ्यांच्या नागरिकांशी वागणुकीबाबतही तक्रारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची बाजू जाणून घ्यावी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात येत आहे.


नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देणे, प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणे आणि कार्यालयीन नियमांचे पालन करणे ही प्रत्येक शासकीय व महानगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

KDMC विद्युत विभाग अधिकारी आयकार्ड प्रकरण

KDMC विद्युत विभाग अधिकारी आयकार्ड प्रकरण



#KDMC #कल्याणडोंबिवली #महापालिका #नागरिकप्रश्न #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.