दिघोळ वनक्षेत्रात दुग्धजन्य पावडरच्या ५०-६० गोण्या बेवारस; खर्डा परिसरातील बनावट दूध रॅकेटवर प्रश्नचिन्ह
जामखेड, दि. २८ जून : जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोळ-तेलंगशी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीत दुग्धजन्य पावडरच्या सुमारे ५० ते ६० गोण्या बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा साठा संशयास्पद असल्याने तो नेमका कोणाचा आहे, तो येथे कसा आणण्यात आला आणि त्याचा वापर कशासाठी होणार होता, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, खर्डा परिसरात बनावट दूध तयार करणारे कारखाने कार्यरत असल्याची चर्चा यापूर्वीपासून होत आहे. अशा पार्श्वभूमीवर वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पावडरचा साठा आढळल्याने या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मात्र, या घटनेचा बनावट दूध निर्मितीशी संबंध असल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही.
राज्यात अन्नभेसळविरोधी कारवायांचा धडाका लावणाऱ्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून जामखेड तालुक्यातील संभाव्य बनावट दूध रॅकेटकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
#BreakingNews #Jamkhed #Kharda #Dighol #FakeMilk #MilkPowder #FDA #Ahmednagar #Maharashtra #ApleSatyaNews

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.