ऑनलाइन शुल्क अनिवार्य; RTO शिबिरांबाबत नवीन नियम जाहीर
जुलै ते डिसेंबर कालावधीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मासिक शिबिरांचे वेळापत्रक जाहीर
अहिल्यानगर, दि. २९ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर यांनी जुलै ते डिसेंबर २०२६ या कालावधीतील तालुकानिहाय मासिक शिबिरांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नागरिकांनी संबंधित तालुक्यात आयोजित शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, पारनेर, जामखेड तसेच काष्टी येथे दर महिन्याला नियोजित तारखांना शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये वाहन नोंदणी, परवाना, वाहन तपासणी व इतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
प्रशासकीय कारणास्तव किंवा सार्वजनिक सुट्टीमुळे शिबिर रद्द झाल्यास ते पुढील कार्यदिवशी आयोजित करण्यात येईल. अपूर्ण कागदपत्रांसह अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सर्व शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे बंधनकारक राहील.
याशिवाय, शिबिरस्थळी परराज्यातील वाहनांची तसेच बसची तपासणी केली जाणार नाही. ज्या तालुक्यात शिबिर आयोजित आहे, त्या तालुक्यातील नागरिकांची कामे संबंधित शिबिरातच केली जातील. नव्याने नोंदणी झालेल्या परिवहन वाहनांच्या तपासणीवेळी वाहनावरील डीलर डिस्क्लेमर काढलेला असणे आवश्यक असून, अन्यथा वाहन तपासणी केली जाणार नाही, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
#RTOशिबिर2026 #RTOCamp #अहिल्यानगर #Ahilyanagar #RTO #परिवहन #मासिकवेळापत्रक #RTOSchedule #वाहननोंदणी #DrivingLicense #AimaMedia #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.