Breaking News

अजय (दादा) काशिद यांच्या नेतृत्वाला यश; सारोळा सोसायटीचा ठराव बिनविरोध



सारोळा सोसायटीचा ऐतिहासिक बिनविरोध ठराव; सौ. जनाबाई बजरंग मुळे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब

अहिल्यानगर, दि. ४ : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारोळा सोसायटीचा ठराव ऐतिहासिक पद्धतीने बिनविरोध मंजूर करण्यात आला. या ठरावाद्वारे सौ. जनाबाई बजरंग मुळे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

हा ठराव विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. युवराज (भाऊ) काशिद यांच्या सहकार्याने तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा. अजय (दादा) काशिद यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आला.

स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभासदांच्या एकमतामुळे हा ठराव कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. सहकार क्षेत्रात एकोपा आणि समन्वयाचे हे उत्तम उदाहरण मानले जात असून, आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. जनाबाई बजरंग मुळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सहकार क्षेत्राच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.