Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण होताच एका दिवसात मिळणार नवे पीक कर्ज

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण होताच एका दिवसात मिळणार नवे पीक कर्ज


कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना शक्य तितक्या लवकर नव्या हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या नियोजनानुसार, कर्जमाफीची नोंद बँकेच्या प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना एका दिवसात नवीन पीक कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खते व इतर शेतीकामांसाठी वेळेवर आर्थिक मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. 


शासनाने बँकांनी कर्जमाफीची प्रक्रिया जलद पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नव्या कर्जासाठी विलंब होऊ नये, यावर भर दिला आहे. लाभार्थींची पडताळणी आणि कर्जमाफीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, पात्रता निश्चित झाल्यानंतर बँका नव्या पीक कर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करतील. 


#शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६

#शेतकरीकर्जमुक्ती

#महाराष्ट्रशासन

#पीककर्ज

#शेतकरी

#कृषीविकास

#अहिल्यादेवीहोळकर

#FarmLoanWaiver

#CropLoan

#Maharashtra

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.