अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्पाला गती; १७ सप्टेंबरपर्यंत पुढील टप्पा पूर्ण करण्याचे निर्देश
अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वे प्रकल्प हा बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित प्रकल्प आहे. या रेल्वेमार्गामुळे या भागातील आर्थिक, औद्योगिक तसेच सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
बीड येथे आयोजित प्रकल्पाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी येत्या मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत (१७ सप्टेंबर) प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.
राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन देत त्यांनी स्थानिक अडथळे दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊन प्रकल्पाची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला.
या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून, प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
#अहिल्यानगर #बीड #परळी #रेल्वेप्रकल्प #मराठवाडा #विकास #सुनेत्राअजितपवार


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.