पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ : ई-केवायसीमध्ये अहिल्यानगर जिल्हा राज्यात अव्वल
अहिल्यानगर | प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) अभियान राज्यभर वेगाने सुरू आहे. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत राज्यातील १६,९६,२०१ लाभार्थ्यांपैकी ८,३३,२२३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून, एकूण प्रगती ४९.८४ टक्के इतकी आहे.
या मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७३.४७ टक्के ई-केवायसी पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, बँका आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयामुळे ही उल्लेखनीय प्रगती साध्य झाली आहे.
राज्यातील इतर आघाडीचे जिल्हे म्हणजे भंडारा (६९.८९%), वाशीम (६७.४८%), ठाणे (६७.४२%), सांगली (६७.३४%), सातारा (६६.५८%), पुणे (६५.४४%) आणि नाशिक (६४.८६%) आहेत.
योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करावे, असे आवाहन शासनाने केले आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्याशी संपर्क साधून प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.