Breaking News

आपलं सत्य अहिल्यानगरचे मुख्य संपादक रविकुमार प्रदीप शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव



आपलं सत्य अहिल्यानगरचे मुख्य संपादक रविकुमार प्रदीप शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अहिल्यानगर | दि. २१ जुलै : आपलं सत्य अहिल्यानगरचे मुख्य संपादक रविकुमार प्रदीप शिंदे यांचा वाढदिवस आज आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पत्रकारिता आणि समाजहिताच्या कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या शिंदे यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच जनतेच्या विविध समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. निष्पक्ष, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांनी वाचकांचा विश्वास संपादन केला आहे.

वाढदिवसानिमित्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार, वाचक आणि हितचिंतक यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपलं सत्य अहिल्यानगर परिवाराने रविकुमार प्रदीप शिंदे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारिता क्षेत्रात अधिकाधिक यश लाभावे, तसेच समाजहिताचे कार्य अधिक व्यापक व्हावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

– आपलं सत्य अहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.