Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रगतीला नवे बळ; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत 6.22 लाख शेतकऱ्यांना ₹5,029 कोटींचा लाभ

 



मुंबई, दि. 8 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना एकूण ₹5,029 कोटींच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. शेतीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध झाल्याने शेतकरी नव्या जोमाने शेती व्यवसायाकडे वाटचाल करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेल्या या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात येत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

#Maharashtra #DevendraFadnavis #Farmers #Agriculture #LoanWaiver #FarmerWelfare #MaharashtraGovernment

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.