पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा टप्पा; ६.३६ लाख शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींचा लाभ
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना तब्बल ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहातून थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.
या योजनेच्या अंमलबजावणीत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, आतापर्यंत १३.७० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ
- अमरावती विभाग : १,४५,८०८ शेतकरी — ₹१,२०८ कोटी
- नाशिक विभाग : ८४,८१३ शेतकरी — ₹७५६ कोटी
- छत्रपती संभाजीनगर विभाग : ३,०२,२७३ शेतकरी — ₹२,२८४ कोटी
- पुणे विभाग : ४९,२२४ शेतकरी — ₹४१७ कोटी
- नागपूर विभाग : ४४,८६४ शेतकरी — ₹३६६ कोटी
- कोकण विभाग : ९,०५४ शेतकरी — ₹५४ कोटी
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.
#शेतकरीकर्जमुक्ती२०२६ #शेतकरी #महाकर्जमुक्ती #कर्जमुक्ती #महाराष्ट्रशासन


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.