मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन; जिल्हा प्रशासनाकडून स्वागत
शिर्डी, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शिर्डी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदामंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिर्डी विमानतळावर आगमनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटारीने राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे प्रस्थान केले. येथे आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत.
#DevendraFadnavis #ShirdiAirport #Ahilyanagar #GangagiriMaharaj #Dhangarwadi


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.