Breaking News

अनुसूचित जातीतील मातंग समाजातील पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती; 3 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज



मुंबई, दि. 4 ऑगस्ट 2026 : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम जातीतील पात्र पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांकडून ‘अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ (ASNRF) योजनेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी याबाबत आवाहन केले आहे.

या योजनेअंतर्गत मातंग, मांग, मिनीमादीग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी आणि मादिगा या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेनुसार कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी प्रतिमाह ₹37,000 तर वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी प्रतिमाह ₹42,000 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पीएच.डी.साठी कायम नोंदणी झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी 4 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत.

महत्त्वाची माहिती

  • योजना: अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (ASNRF)
  • अर्ज कालावधी: 4 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026
  • पात्रता: 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान पीएच.डी.साठी कायम नोंदणी असलेले पात्र विद्यार्थी
  • कनिष्ठ अधिछात्रवृत्ती: ₹37,000 प्रतिमाह
  • वरिष्ठ अधिछात्रवृत्ती: ₹42,000 प्रतिमाह

अधिक माहिती, पात्रता निकष, मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रकासाठी आर्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज सादर करावेत.

#ARTIMumbai

#PhDFellowship2026

#AnnaBhauSatheFellowship

#Scholarship

#EducationNews

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.