Breaking News

धोंडपारगाव येथे २५ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताह; श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन...

 


जामखेड : तालुक्यातील धोंडपरगाव येथे समस्त गावकरी मंडळींच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ ते मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

या सप्ताहात दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन तसेच हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठ चालक म्हणून कुंडलिक शिंदे, नवनाथ शिंदे व गितेबाबा दादेगाव यांची जबाबदारी राहणार आहे.

सप्ताहादरम्यान विविध ठिकाणच्या ह.भ.प. महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ह.भ.प. संदेश महाराज इंगळे (दिंडी), ह.भ.प. विभीषण महाराज अंधुरे (धनगाव), ह.भ.प. माऊली महाराज वावळे (आळंदी देवाची), ह.भ.प. शरद महाराज लेकुरवाळे (कुरुंदवाड), ह.भ.प. परमेश्वर महाराज खैरे (गिरवली), ह.भ.प. गणेश महाराज नलवडे(शिरुर) तसेच ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे (ताकळीभूषण, लिमगाव) यांचा सहभाग राहणार आहे.

ब्रह्मपत्र वाचक म्हणून श्री. कुंडलिक शिंदे, श्री. छगन शिंदे श्री. नवनाथ शिंदे आणि ह.भ.प. श्री. रामचंद्र शिंदे (भाऊसाहेब) यांचे दररोज दुपारी ब्रह्मपत्रवाचन होणार आहे.

मंगळवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता देवदर्शन व फुल लावण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत वारकरी ह.भ.प. कैलास महाराज भोरे देवदेवळण यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, दिंडी प्रदक्षिणेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, धोंडपारगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठिकाण : धोंडपरगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
कालावधी : २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६


#अखंडहरिनामसप्ताह #ज्ञानेश्वरीपारायण #धोंडपारगाव #जामखेड #अहिल्यानगर



No comments

Note: Only a member of this blog may post a comment.