Breaking News

गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एक ताब्यात, दुसरा फरार

 बीडच्या पिंपळनेर हद्दीत गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई; ८.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. खांडेपारगाव शिवारात करण्यात आलेल्या या कारवाईत गुटख्यासह इनोव्हा कार असा एकूण ८ लाख ५५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पिंपळनेर-बीड मार्गावरून इनोव्हा कारमधून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खांडेपारगाव शिवारात छापा टाकला. यावेळी एकाला ताब्यात घेण्यात आले, तर कार थांबवून आणखी एकजण शेतातून पसार झाला.

या प्रकरणी सचिन भिमराव माटे (वय ३४, रा. भीमनगर, गेवराई) आणि रशीद सय्यद (रा. उमापूर, ता. गेवराई) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७३, २७४, २२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.

#बीड #पिंपळनेर #गुटखा_जप्त #CrimeNews #PoliceAction


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.