पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली विचारपूस
अहिल्यानगर, दि. ६ : राज्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक तथा पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ झाल्याने अण्णा हजारे यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते राळेगण सिद्धी येथे परतले आहेत.
प्रा. राम शिंदे यांनी अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थित सहकाऱ्यांकडून उपचारांबाबत माहिती जाणून घेतली. अण्णा हजारे यांचे समाजकार्यातील योगदान प्रेरणादायी असून त्यांनी उत्तम आरोग्य लाभून पुन्हा सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी लाभेश औटी, सुरेश पठारे, रोहन मांडे, जयसिंग मापारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
#AnnaHazare #RamShinde #Ahilyanagar #RaleganSiddhi #MaharashtraNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.