मुंबई (मध्य) RTO मध्ये दुचाकींसाठी MH01FL नवीन मालिका; पसंतीचा क्रमांक आरक्षित करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करा
मुंबई, दि. ६ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी खासगी संवर्गातील वाहनांसाठी MH01FL ही नवीन नियमित वाहन क्रमांक मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करून घेण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक शुल्काचा धनादेश "प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य)" यांच्या नावे सादर करावा. आरक्षित वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांची राहणार आहे.
अर्जासोबत फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जाचे नमुने कार्यालयातील खिडकी क्रमांक E-11 येथे १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
#मुंबई #RTO #MH01FL #वाहनक्रमांक #दुचाकी #परिवहन #ब्रेकिंगNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.