Breaking News

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बनावट नोटा छापणारी टोळी अटकेत; १२.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात बनावट ₹५०० च्या नोटा तयार करणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ₹१२.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तळेगाव शिवारातील हिरामण दाते यांच्या बंगल्यावर फॉरेन्सिक पथकासह छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपी बनावट नोटा तयार करत असल्याचे निष्पन्न झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेलंगणा राज्यातील दोन, नाशिकमधील दोन आणि सातपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ₹९.७५ लाखांची रोख रक्कम (₹५०० च्या १,९५० अस्सल नोटा), नोटांच्या आकाराचे कोरे कागद, नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, छपाईसाठी लागणारी साधने, मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन यांचा समावेश असून एकूण किंमत ₹१२,१९,५८० इतकी आहे.

प्राथमिक तपासात आरोपी केमिकलच्या साहाय्याने अस्सल ₹५०० च्या नोटांच्या आधारे बनावट नोटा तयार करून आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७८, १८०, १८१, १८२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

टॅग्स: #Nashik #






Trimbakeshwar #FakeCurrency #CrimeNews #MaharashtraPolice

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.