फॅक्ट चेक: लाडकी बहीण योजनेत मोफत इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार? दावा खोटा
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फॉर्म भरल्यानंतर मोफत इलेक्ट्रिक स्कूटर दिली जाणार असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. राज्य शासनाने हा दावा फेटाळून लावत नागरिकांना अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या (DGIPR) फॅक्ट चेकनुसार, फेसबुक पोस्टमध्ये दिलेला फॉर्म Jobsvalaa नावाच्या वेबसाइटवर उपलब्ध असून त्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी कोणताही संबंध नाही.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अशा अनधिकृत फॉर्मद्वारे नागरिकांची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती भरताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी.
राज्य शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय योजना, अर्ज आणि सेवा यासंबंधीची माहिती केवळ अधिकृत .gov.in किंवा .nic.in संकेतस्थळांवरूनच घ्यावी. लाडकी बहीण योजनेची अधिकृत माहितीही शासनाच्या अधिकृत पोर्टलवरच उपलब्ध आहे.
Tags:
#LadkiBahinYojana #FactCheck #DGIPR #MaharashtraGovernment #FakeNews


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.