नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ९व्या हप्त्याबाबत शासनाकडे स्पष्ट माहितीची मागणी
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लाखो पात्र शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ९व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना, या हप्त्याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार रवि शिंदे यांनी मुख्यमंत्री, अपर मुख्य सचिव (कृषी) आणि कृषी आयुक्त यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगामातील पेरणी, बियाणे, खते, औषधे, मजुरी व इतर शेती खर्चामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे ९वा हप्ता कधी वितरित होणार याबाबत शासनाने अधिकृत माहिती जाहीर करावी.
रवि शिंदे यांनी शासनाकडे पुढील मुद्द्यांवर स्पष्ट माहिती मागितली आहे.
- ९व्या हप्त्यासाठी शासन निर्णय (GR) नेमका कधी जारी होणार?
- शासन निर्णयाची अपेक्षित तारीख किंवा कालमर्यादा काय आहे?
- शासन निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी कधी जमा होणार?
- ९व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा कधी केली जाणार?
- निधी वितरणास विलंब होत असल्यास त्यामागील कारणे कोणती?
निवेदनात हा विषय कोणत्याही वैयक्तिक लाभाशी संबंधित नसून महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासनाने निश्चित तारीख व कालमर्यादा जाहीर करून शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे
Tags: नमो शेतकरी, Namo Shetkari, 9th Installment, Maharashtra Farmers, GR, Agriculture Department, CM Maharashtra, रवि शिंदे, शेतकरी योजना, महाराष्ट्र


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.