Breaking News

ग्रामसेवकांची उपस्थिती आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे; ग्रामविकास विभागाचे सर्व जिल्हा परिषदांना निर्देश

 


मुंबई | प्रतिनिधी | १८ ऑगस्ट २०२६

ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांच्या उपस्थितीबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची उपस्थिती जीपीएस (GPS) आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामविकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, यापूर्वीही या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी अद्यापही या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत.

यामुळे संबंधित जिल्हा परिषदांनी आपल्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची उपस्थिती जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नियमितपणे नोंदविण्याची खात्री करावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील उपस्थिती व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

Tags: #ग्रामविकास #ग्रामसेवक #GPSAttendance #BiometricAttendance #महाराष्ट्रशासन



No comments

Note: Only a member of this blog may post a comment.