प्रकल्पग्रस्तांच्या भरती तक्रारींसाठी चौकशी समिती स्थापन; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई, दि. १२ : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या विविध तक्रारी तसेच विद्यापीठातील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांच्या भरती व सेवाविषयक तक्रारींची सखोल चौकशी करून योग्य निर्णय घेण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीने प्रकल्पग्रस्तांच्या सर्व तक्रारींची तपासणी करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.
या चौकशी समितीत विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, विद्यापीठाचे कुलसचिव तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. समितीमार्फत प्रकल्पग्रस्तांच्या सेवाज्येष्ठतेची, प्रमाणपत्रांची पडताळणी, पात्र उमेदवारांच्या याद्यांमधील त्रुटी तसेच भरती प्रक्रियेशी संबंधित इतर बाबींची सखोल तपासणी केली जाणार आहे.
बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी सेवाज्येष्ठता, दाखल्यांची वैधता, पात्र उमेदवारांच्या याद्यांतील त्रुटी आणि भरती प्रक्रियेबाबत विविध मागण्या व तक्रारी मांडल्या. पात्र उमेदवारांना न्याय मिळावा आणि तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री जाधव-पाटील यांनी दिले.
यावेळी रणधीर सावरकर आणि सहसचिव संजय इंगळे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी अकोला आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी सहभागी झाले.
#मकरंदजाधवपाटील #प्रकल्पग्रस्त #भरतीप्रक्रिया #अकोला #कृषीविद्यापीठ #महाराष्ट्रसरकार #आपलंसत्यअहिल्यानगर


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.