Breaking News

अहिल्यानगर: अवैध गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचा दणका; 14 जणांवर 4 गुन्हे, ₹73 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

अवैध गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचा दणका; 14 जणांवर 4 गुन्हे

अहिल्यानगर, दि. 21 ऑगस्ट: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत 14 जणांविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. जामखेड व तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकून ₹73,766 किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन विशेष पथके तयार करून अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांची माहिती संकलित केली.

19 व 20 ऑगस्ट रोजी धडक कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी 19 व 20 ऑगस्ट 2026 रोजी जामखेड आणि तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तीन आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काही आरोपी ताब्यात, काही फरार

या कारवाईत काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तुषार राळेभात, सार्थक राळेभात, राजू घोडके, फैयाज तांबोळी, आत्तु उर्फ आदीबखान पठाण आणि पाश्या उर्फ फिरदोसखान पठाण यांच्यासह काही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जप्त मुद्देमाल

  • जामखेड गुन्हा क्र. 571/2026 – ₹13,730
  • जामखेड गुन्हा क्र. 572/2026 – ₹16,688
  • जामखेड गुन्हा क्र. 573/2026 – ₹40,408
  • तोफखाना गुन्हा क्र. 715/2026 – ₹2,940

या चारही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274, 275 व 3(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी केली.



Tags:
अहिल्यानगर, जामखेड, एलसीबी, अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू, पोलीस कारवाई, मुम्मका सुदर्शन, संतोष मुटकुळे, गुन्हे, महाराष्ट्र न्यूज



No comments

Note: Only a member of this blog may post a comment.