Breaking News

राज्यातील इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर; ₹174.19 कोटींच्या योजनेस मंजुरी

 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर; ₹174.19 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी

मुंबई, दि. 20 ऑगस्ट : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी ₹174 कोटी 19 लाख 35 हजार 424 इतक्या निधीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढण्यास, शिक्षणातील सहभाग अधिक प्रभावी होण्यास तसेच शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, शासनाने या उपक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.


Tags:
#शालेयदप्तर #शालेयशिक्षण #महाराष्ट्रशासन #विद्यार्थी #EducationNews




No comments

Note: Only a member of this blog may post a comment.