नेपाळमधील भीषण पुरात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; मदतीसाठी 24 तास हेल्पलाईन कार्यरत
भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत; महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी
अहिल्यानगर : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुराच्या तडाख्यात विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने मंत्रालयातील नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत, माहिती किंवा आपत्कालीन सहाय्याची आवश्यकता असल्यास त्यांनी खालील हेल्पलाईन क्रमांक अथवा ई-मेलवर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
📞 राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : 1070
(टोल-फ्री क्रमांक)
📱 नियंत्रण कक्ष : +91-9321587143
📧 अधिकृत ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in
नेपाळमधील पूरस्थिती लक्षात घेता अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधावा आणि मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
#NepalFlood #BhoteKoshiRiver #MaharashtraHelpline #NepalFloodUpdate #MaharashtraGovernment


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.